अनुवादक मंच या संस्थेने राज्यात वाढत्या #अनुवाद साहित्याच्या लोकप्रियतेचा दाखला देत एक महत्त्वाची मागणी पुढे केली आहे. संस्थेचे म्हणणे आहे की, ९९व्या अखिल भारतीय #मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून एखाद्या अनुभवी #अनुवादकाची निवड व्हावी.
या मागणीमुळे साहित्य क्षेत्रात नवा वाद सुरू झाला आहे. समर्थकांचा दावा आहे की, अनुवादक मराठी साहित्याचा जागतिक स्तरावर दुवा ठरत आहेत, तर विरोधक संमेलनाच्या पारंपरिक रचनेत बदल नकोत असे सांगत आहेत.